आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

103 वर्षांच्या आजींनी केली कोरोनावर मात:दहा दिवसांत आजी ठणठणीत, आनंदाने रहा असा संदेश ही आजींनी घरी जाताना दिला

कोल्हापूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील १०३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. अवघ्या दहा दिवसांत त्या बऱ्या होवून घरी गेल्या. दहा दिवसांत व्हाईट आर्मीच्या मोफत कोविड सेंटरला आजींनी आपलंस केलं होतं. आज त्यांना निरोप देताना आनंदही झाला. प्रेमळ आजींना घरी जाताना सेंटरमधील सर्वांनी टाळ्या वाजवून निरोप दिला.

पहिला नातवाला, नंतर सुनेला आणि मग चक्क १०३ वर्षांच्या आजींना कोरोनाने ग्रासले. पण नेहमी सर्वांना आनंदी रहा असे सांगणाऱ्या आजींनी मात्र अगदी सहज कोरोनावर मात केली. धाडसाने त्यांनी कोरोनाचा सामना केला. दहा दिवसांत कोविड केअर सेंटरमधील सर्वांना आजींनी आपलेसे केले. मुला... बाळ... अशी हाक देणाऱ्या आजी इथली सगळी माझी लेकरं आहेत असे म्हणायच्या.

सर्वांना भांडू नका आनंदाने राहावा अशा शब्दात आजी आनंदाने जगण्याचा मूलमंत्र देत होत्या. जुनं ते सोनं असे म्हणून जुन्या काळातल्या तिच्या आठवणी, गाई-म्हशीच्या धार काढणे, घरचा अंगण सारवूने ही सगळी कामं करत होते असे सांगून आमच्या घरा शेजारी गिरणी नव्हती हाताने दळायचं अशी सगळी कष्ट उपसून शंभरी पार केल्याचे सांगण्यात मग्न व्हायच्या असे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी सांगितले.

कोरोनावर मात केलेल्या आजींचा हा जणू पुनर्जन्मच आहे असे माणून कोविड केअर सेंटर कडून घरी जाताना केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. व्हाईट आर्मीच्या मोफत कोविड सेंटर येथे या दहा दिवसांच्या वास्तव्यात आजींनी आम्हा सर्वांना प्रेरणा दिली असे इथल्या सर्वांनी सांगितले. खरे तर आम्ही आजीच्या सेवेसाठी होतो पण आजींनी सर्वांची काळजी घेतली. असा एक वेळा अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळाला असेही रोकडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...