आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 लाखांची दुचाकी अन् कार आगीत जळून खाक:कळंब्यात वाजत गाजत आणलेली दुचाकी भस्मसात; आगीचे कारण अस्पष्ट

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाचे आपल्या दुचाकीचे एक स्वप्न असते, कोल्हापुरातील राजेश चौगुले याने ही 21 लाखांची दुचाकी घेतली होती. गावात ढोल ताश्याच्या गजरात दुचाकीची मिरवणूक ही काढण्यात आली. मात्र कळंबा परिसरात लागलेल्या रात्री 3 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत 2 वाहने जळून खाक झाली आहे. यात दुचाकीसह एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात महागदुचाकी गाडी विकत घेतल्याने तरुणाने गावातून दुचाकीची जंगी मिरवणूक काढली होती. यामुळे गावात गाडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. मात्र त्यांचा हा आंनद जास्त दिवस राहिला नाही. आज पहाटेच दुचाकीला आग लागली, ही गोष्ट चौगुले कुटुंबांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाला संपर्क केला, मात्र अग्निशमन दल येईपर्यंत बाजूला असलेल्या कारने पेट घेतला. यामध्ये जवळपास 40 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत दुचाकीची मालक राजेश चौगुले यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. आग लागली की अज्ञातांनी आग लावली हे स्पष्ट होत नसल्याने चौगुले कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...