आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर कोरोना:आडिच महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, टाळ्या वाजवून देण्यात आला निरोप

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच एका अडीच महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. आई आणि बाळाला पन्हाळा येथील एकलव्य कोरोना काळजी सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सेंटरमधून कोरोनावर मात करून बाहेर पडणारा आडिच महिन्याच्या चिमुकल्याला आणि त्याच्या आईला टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील 35 वर्षाचा तरुण गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेला होता. तेथेच त्यांच्या बाळाचा जन्म झाला. दिनांक 16 जुलै रोजी ते सुरतहून आपल्या पत्नी आणि सासूसह कोल्हापूरमध्ये आले होते. किणी तपासणी नाक्यावर त्यांना पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य कोविड सेंटर इथं पाठवण्यात आले होते. दिनांक 17 जुलै रोजी या चौघांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 18 जुलै रोजी चौघांचेही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. तेंव्हापासून या दोघांना या सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. आडिच महिन्याच्या चिमुकल्यासह आई वडील आणि आजी नुकतेच बाहेर पडले. कोविड सेंटरमधील सर्वांनी टाळ्या वाजवून चिमुकल्याला निरोप दिला.