आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनवामाची भागात बिबट्यांसह आढळली 3 पिल्ले:शेतातून 1 पिल्लू मादी बिबट्या घेऊन गेली, 2 पिल्ले नेण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

सातारा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनवासमाची तालुका कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात बिबट्या आढळला. विशेषतः तिथे आधी बिबट्यांची तीन पिल्लेही आढळली, यातील एका पिल्लाला मादी बिबट्या घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. हे फुटेज आज जारी झाले आहेत.

ऊसाच्या शेतात होती तीन पिल्ले

वनवासमाची तालुका कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली होती. त्यापैकी एका पिल्लाला त्यांची आई मादी बिबट्या मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घेऊन गेली आहे.

2 पिल्लांना त्याच ठिकाणी ठेवले

तीनपैकी दोन पिल्ले वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित आहेत. या पिल्लांना त्याच ठिकाणी उसाच्या शेतात कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. आईशी पिल्लांची ताटातूट झाल्याने पिल्लांच्या ओढीने मादी बिबट्या जास्त रागीट होऊ नये म्हणून ती पिल्ले तेथेच ठेवण्यात आली आहेत.

दोन पिल्ले नेण्याची प्रतीक्षा

मादी बिबट्या परत येईल आणि उर्वरीत दोन पिल्ले घेऊन जाईल अशी वनविभागाला आशा आहे. त्यासाठी वनविभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून आईचा पिल्लांना सहवास लाभावा हाच उद्देश असून जेथे पिल्ले होती त्या उसाच्या रानात पुन्हा एका क्रेटमध्ये पिल्लांना ठेवण्यात आले आहे. पिल्लांचे मूत्र हे रानात विविध ठिकाणी मादीला पिलांचा वास यावा म्हणून शिंपडण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...