आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन गणेशोत्सवात तासवडे गावावर शोककळा:फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू

सातारा / प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेल्यानंतर वीजेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दोघे बचावले

कराड तालुक्यातील तासवडे गावात शुक्रवारी रात्री साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दीर, भावजयीसह एका मुलाचा मृत्यू झाला. हिंदुराव मारुती शिंदे (वय ५८), सीमा सदाशिव शिंदे (वय ४८) आणि शुभम सदाशिव शिंदे (वय २३), अशी मृतांची नावे आहे. तर, दोघेजण या घटनेतून बचावले आहेत.

नेमके काय घडले?

तासवडे येथील शिंदे वस्तीत राहणारे हिंदुराव मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे हे सायंकाळी विहिरीजवळच्या शेतात फुले तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

नागरिकांची धाव

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरीकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वीजेच्या जबर धक्क्याने व विहिरीत पडल्याने मारुती शिंदे, त्यांची भावजय सीमा सदाशिव शिंदे आणि पुतण्या शुभम सदाशिव शिंदे यांचा मृत्यू झाला होता. तर, नीलेश शंकर शिंदे (वय 25) आणि विनोद पांडुरंग शिंदे (वय 40) हे दोघेजण सुदैवाने बचावले. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे तासवडे गावावर शोककळा पसरली आहे.

तासाभरानंतर मृतदेह विहिरीतून काढले

शॉक लागल्याच्या घटनेनंतर सुमारे तासाभरानंतर तिघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे शिंदे वस्तीवर शोककळा पसरली. रात्री उशीरा तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला हलविण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...