आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टॅम्पोने वारकर्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले असून एका वारकर्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवार 19 जून रोजी पहाटे घडला.
पहाटे घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ इथे खडाळा गावाच्या हद्दीत पहाटे 3 वाजता अपघात झाला आहे. एक भरधाव आयशर टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळाची दिंडी पंढरपूर पायी वारीसाठी आळंदी ते पंढरपूर निघाली होती. शिरवळ इथे खडाळा गावाच्या हद्दीत पोहोचले असता आयशर ट्रकने पाठीमागून वारकऱ्यांच्या ट्रॉलीला जोराची धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक पलटी झाला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी बाहेर फेकले गेले. ट्रॉलीचा पाठीमागच्या भाग चक्काचूर झाला आहे.
वाहन चालकाचा सुटला ताबा
वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या धडकेमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी थेट रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर शिरवळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरु केले. जखमींवर शिरवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ.जोगळेकर हॉंस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.