आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:कॅसिनो जुगारात 32 लाखांची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅसिनो जुगारात हजार रुपये खर्चून ३२ लाख ५० हजार रुपये जिंकले होते. ही रक्कम न देता एकाची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत जीवन बापूसाहेब सुतारने (खोचीकर) वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय माने, चंद्रकांत जाधव (दोघे रा. वडगाव), काबूल व मोमीन (पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकला नाही), मोहन व महेंद्रभाई गणात्रा, अनिल निर्मळे, अमित ठक्कर, जुगार कंपनी मालक आदींच्या विरोधात गुन्हा नोंद केला. मुख्य संशयित अक्षय माने व त्याचा कामगार चंद्रकांत जाधव यांनी मोबाइलवरील विन लकी गो ऑनलाइन कॅसिनो जुगार सुरू केला होता. यात सुतारने २० जानेवारी ते २१ जानेवारीदरम्यान हजार रुपये खर्चून ३२ लाख ५० हजार रुपये जिंकले होते. अरोपींकडे पैशाची मागणी केली असता, त्यांनी देण्यास टाळाटाळ करत सुतारला दमदाटी व शिवीगाळ केली.

बातम्या आणखी आहेत...