आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेपनीय माहिती:चोपड्याजवळ पोलिसांची कारवाई:साताऱ्याकडे 6 गावठी कट्टे, 30 काडतूस नेणारे 4 अटकेत

चोपडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा येथे सहा गावठी कट्टे, ३० काडतूस घेऊन जाणाऱ्या चाैघांना चोपडा पोलिसांनी चोपडा- शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ पकडले. दोन जण फरार झाले. शहर पोलिसांनी १७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

चोपडा ते शिरपूर रोडवरील एस्सार पेट्रोलपंपाजवळ १७ रोजी रात्री ९.३० वाजता गणेश उर्फ सनी सुनील शिंदे (वय २५ रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा), मोहसीन हनिफ मुजावर (३० रा. युवराज पाटील चौक, मसूर, ता. कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (वय २३, रा. शिवाजी चौक, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) व अक्षय दिलीप पाटील( वय २८, रा. रविवार पेठ, कराड, जि. सातारा) हे चौघे चाेपड्यात आले हाेते.

असा मुद्देमाल केला जप्त या चाैघांकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ६ गावठी कट्टे, ३० हजारांचे ३० जिंवत काडतूस, ८७ हजारांचे ४ मोबाइल फोन व ३५ लाखांची फोर्ड एंडेव्हर चारचाकी ( एमएच- ५०, एल- ८१८१)गाडी असा ३७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध चोपडा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली.

यांना मिळाली पोलिस कोठडी या प्रकरणात गणेश उर्फ सनी शिंदे, मोहसीन हनिफ मुजावर, रिजवान रज्जाक नदाफ व अक्षय दिलीप पाटील चाैघांना न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणात दोन जण फरार आहेत. सरदार शिखलकर (रा. पारउमर्टी, जि. बडवानी) याच्या जवळून हे साहित्य घेतल्याची माहिती पुढे आली.

बातम्या आणखी आहेत...