आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कोल्हापूर जिल्हा बँकेचे 5 अधिकारी ईडीच्या ताब्यात, कर्मचाऱ्यांचे जेवण, कपडे बँकेत मागवून घेतले

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले. १० ते १५ अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सकाळी आठ वाजल्यापासून तपासणी सुरू केली होती. संपूर्ण तपासणी आणि चौकशीनंतर ईडीने बँकेतील ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये डॉ. अशोक माने, आर. जे. पाटील, अल्ताफ मुजावर, सचिन डोनकर आणि राजू खाडे यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे बँकेच्या कर्मचारी युनियनने ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्या सर्वांना कालपासून घरीही सोडण्यात आले नव्हते. तसेच त्यांचे सर्व कपडे जेवण हे बँकेमध्येच मागून घेण्यात आले होते. दरम्यान, येथील कर्मचारी संघटना या आक्रमक झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...