आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:तिच्या भक्तीला न उरे अंत; 73 वर्षांच्या ताई बिरांजे देतात महालक्ष्मी पालखी पुढे गायन सेवा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात पालखी पुढे भरणार्या दरबारात कला सादर करण्याचा मान कलावंतीणीला होता. साधारणतः तीस पस्तीस वर्षांपूर्वी पासून ही प्रथा खंडित झाली. पण त्या कलावंतीणीच्या सुराला सुर देत पालखी सोबत येणाऱ्या ताई बिरांजे यांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. ७३ वयाच्या ताईंचे कवन झाल्यावरच नवरात्रोत्सवात पालखी मार्गस्थ होते. वार्धक्याने शरीर थकले... आवाजात कंप येवू लागला आहे तरी न चुकता रात्री आठच्या ठोक्याला ही माऊली मंदिरातील एका पायरीवर येवून बसलेली असते. पालखी मंदिराच्या पायरीवरून उतरली की तडक ही माऊली पालखी समोर गायला उभी राहते. तीच्या या भक्तीला अंत नाही हेच खरे.

देवीच्या पालखी पुढील गायकीचा इतिहास मोठा आहे. इ. स. १५ व्या शतकात यवनी आक्रमने होऊन मंदिरे उध्वस्त केली जायची. त्या काळात मुकब्रा खान याने दख्खन पादाक्रांत करण्यासाठी मोहीम आखली. यामध्ये करवीर क्षेत्री एका रात्री येऊन महालक्ष्मी मंदिर उध्वस्त करण्याचा कट केला होता. याची भणक लागताच तत्कालीन राजवटीने त्याला गुमराह करण्याची जबाबदारी एका नायकीनीला दिली. तिने मुकब्रा खान याला आपल्या नृत्य व गायकीने खिळवून ठेवले. पहाटे मंदिरात भक्त येईपर्यंत तिने जबाबदारी निभावली. त्यामुळे रात्रीत होणारे आक्रमणापासून मंदिर सुरक्षित राहीले. पण त्या नायकीणीला आपले प्राण गमवावे लागले. तिच्या या बलिदानाबद्दल पालखी पुढे गाण्याचा मान कलावंतीण घराण्याला देण्यात आला होता. शाहू कालखंडात सोफिजा खान, साहेबजान खान गायकी करत. त्यांच्या नंतरच्या पीढ्यांनीही ही परंपरा कायम ठेवली होती.

साधारणतः पस्तीस वर्षांपूर्वी पर्यंत कलावंतीण घराण्यातील महिला येवून पालखी पुढे नृत्य व गायन सादर करीत होत्या.त्यांच्यानंतर घरी भजनी परंपरा असलेल्या ताई बिरांजे यांनी ही परंपरा जोपासली आहे. देवीची सेवा करण्यासाठी वय झाले तरी त्या न चुकता येतात. देवस्थान समितीकडून त्यांना साडीचोळीचा मान दिला जातो. ताईंच्या सोबत आजची तरुण पिढी देवीच्या पालखी पुढे गाण्याची सेवा देत आहे. बिरांजे आजी म्हणतात गायकीचा मान कलावंतीणीला होता हा इतिहास आहे. तिच्या घरचे कुणी नाही...मला देवीची सेवा करायला मिळते हे माझे भाग्य समजते. आमचं भजनी घराणं..एखादा अभंग, गाणं देवीपुढे गाण्याचे समाधान मोठे आहे.

मंदिर आवारात या सात ठिकाणी भरतो देवीचा दरबार..

पालखी गणेश मंडपातून बाहेर पडून मार्गस्थ होण्यापूर्वी दत्त मंदिरापुढे, मणिकर्णिका कुंडाच्या ठिकाणी, व्यंकटेशा समोर, कात्यायणी देवी समोर, गौरी शंकर मंदिरा समोर, गणेश मंडळाचा दक्षिण दरवाजा समोर, महाद्वारापुढे पालखी थांबते गाणे होते व पुन्हा मार्गस्थ होते.