आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुदरगड तालुक्यातील पाचवडे येथील८५ वर्षाच्या आजीला आणि शिंदेवाडीतील ४ महिन्याच्या बाळासह आईला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
पाचवडे येथील मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांची 85 वर्षाची आई देखील 19 जुलै रोजी रात्री 10 वाजता उपचारासाठी दाखल झाल्या. डॉ. भगवान डवरी, डॉ.मिलिंद कदम, डॉ. अमोल गुरव, डॉ. महेश गोनुगडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दोघांचाही स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. जाताना या आजींनी सर्व पथकाला आशीर्वाद दिला.
४ महिन्याचे बाळ आणि आईचीही मात
भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडी येथील ४ महिन्याचे बाळ आणि त्याची आई २१ जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ट्रेनिंग सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळाच्या आईला औषधोपचाराबरोबरोच मानसिक पातळीवर सकारात्मकता निर्माण करणे आवश्यक होते. येथील पथकाने उत्तम पध्दतीने ते केले. बाळालाही योग्य औषधोपचार करण्यात आला. या दोघानाही डिस्चार्ज देण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.