आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली हादरली:डॉक्टर कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या; कर्जामुळे टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता, 8 सावकार ताब्यात, चौकशी सुरू

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ येथे डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 8 खासगी सावकारांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

मृतांमध्ये डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्यासह घरातील सदस्यांच्या समावेश आहे.​​​​​ कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. सध्या मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय. आत्महत्या केलेले पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. यावरूनच पोलिसांनी आठ खासगी सावकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलीय. दरम्यान, दुसरीकडे गुप्तधनासाठी या कुटुंबाने कर्ज काढले. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, अशी चर्चाही सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या संपूर्ण कुटुंबांने आत्महत्या केली आहे. कुटुंबातील साऱ्या सदस्यांनी विष घेतल्याचे समजते. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका चौक येथील मळ्यात व्हेटरनरी (पशु वैद्यकीय डॉक्टर) वनमोरे कुटुंबिय रहात होते. तर एक कुटुंब थोड्याच अंतरावर राजधानी नगर येथे रहात होते. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडला गेला नाही तेव्हा शेजारी रहाणार्‍यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जणांनी आत्महत्त्या केल्याचे दिसून आले. त्यानंंतर शेजार्‍यांनी या कुटुंबियांतील दुसर्‍या भावाला हे वृत्त सांगण्यासाठी गेले असताना त्याच्या घणातही तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना सामोरी आली.

पंधरा हजार वस्तीच्या या गावात 10 राष्ट्रीयकृत बँक, चार खासगी बँका, आठ शेड्युल्ड बँका, तसेच सुमारे 20 सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. वनमोरे कुटुंबियांनी शेतीच्या साठीच कर्ज घेतले असावे, असे सांगितले जाते. खासगी सावकरांच्या दहा टक्के व्याजामुळे हे सधन कुटुंब आर्थिक विवंचनेत फसले गेले असावे. पोपट वनमोरे यांच्या खिशातील चिठ्ठतील मजकुरावरून या आत्महत्त्येला कोण कारणीभूत आहे. हे स्पष्ट होणार आहे.

असा आला संशय

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी दवाखान्यातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मोबाइल उचलत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, कुटुंबातील सर्व जण मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यांना धक्का बसला.

बातम्या आणखी आहेत...