आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-पासेस बोगस:मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या 93 जणांना परत पाठवले

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी एजंटला प्रत्येकी तीस हजार रुपये देऊन काही प्रवासी गाड्यांतून कोल्हापूरला येण्याचा प्रयत्न केला

मुंबईवरून कोल्हापूरकडे सहा मिनी बसेसमधून निघालेल्या १०३ प्रवाशांपैकी ९३ प्रवाशांचे ई-पासेस बोगस निघाल्याने शिराळा तालुक्यातील कोकरूड पोलिसांनी या प्रवाशांना मुंबईला परत पाठवले. हे सर्वजण मुंबईतील एका खासगी एजंटाकडून ई-पासेस घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात परतत होते. दरम्यान, या प्रवाशांना भरदुपारी उन्हात ताटकळत ठेवून त्यांना माघारी जाण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केल्याची तक्रार या प्रवाशांकडून करण्यात आली.

कोरोनाच्या विषाणूच्या धास्तीने मुंबईत अडकलेल्या हजारो नागरिकांना मूळ कोल्हापूर जिल्ह्यात परतायचे आहे. त्यासाठी त्यांनी रविवारी रात्री एका खासगी एजंटला प्रत्येकी तीस हजार रुपये देऊन काही प्रवासी गाड्यांतून कोल्हापूरला येण्याचा प्रयत्न केला. मात्र, सांगली-कोल्हापूरच्या सीमेवर पोलिसांच्या तपासणी नाक्यावर या प्रवाशांचे तयार करण्यात आलेले ई-पासेस बोगस असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना परत मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे सोडायचे होते. त्यासाठी डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालयातील तपासणी केंद्रात त्यांना दाखल करण्यात येणार होते. मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत लागणाऱ्या चार जिल्ह्यांची सीमा ओलांडून हे प्रवासी सकाळी कोल्हापूरच्या हद्दीजवळ पोहोचले. त्या वेळी सांगली पोलिसांनी त्यांच्या ई-पासेसची तपासणी केली असता हा सारा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना पुन्हा मुंबईला पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...