आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय जैन चिंतन शिबीर:कोल्हापूर जिल्ह्यातील कुंथूगिरीत जैन समाजाचे 2 दिवसीय शिबीर, लोकप्रतिनिधीही राहणार उपस्थित

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंथूगिरीत 10 ते 12 जून या तीन दिवसात राष्ट्रीय जैन चिंतन शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जैन समाजाची वर्तमान परिस्थिती आणि प्रगतीचा मार्ग या विषयावर चिंतन करण्यात येणार आहे. यासाठी भारतातून सुमारे दोन हजार जणांची उपस्थिती राहणार आहे. कुन्थूसागर महाराज यांच्या उपस्थितीत हे शिबीर होणार आहे अशी माहिती दिगंबर जैन तिर्थक्षेत्र कमिटीचे राज्यध्यक्ष अनिल जमगे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते येथील कुन्थूगिरी येथील जैन तिर्थक्षेत्रात शिबीर होणार आहे. 10 जून रोजी ध्वजारोहण, सकाळी पंचामृत अभिषेक, मिरवणूक होणार असून. सकाळी 10 वाजता जैन महिला संम्मेलन होईल. यात शिखरचंद पहाडिया मुंबई, रावसाहेब पाटील बोरगांव, शांतीलाल मुथ्था पुणे, गरजराज गंगवाल दिल्ली, अशोक बडजात्या इंदौर, विजय भंडारी, संतोष जैन नागपूर हे उपस्थित राहतील.

मंत्रिमंडळातील सदस्यांचीही उपस्थिती

राज्यातील मंत्री जयंत पाटील, धनजंय मुंडे, संतेज पाटील, बाळासाहेब थोरात, गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे, दिल्लीचे लोकपाल डी. के. जैन यांच्यासह खासदार, आमदार व जैन समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जमगे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...