आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:कोरोना पाॅझिटिव्ह-निगेटिव्हचा घोळ; कोल्हापुरात महिलेची भररस्त्यात प्रसूती

कोल्हापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेच्या भोवती कापडी आडोसा उभा करण्यात आला होता.
  • अहवाल निगेटिव्ह आल्याचे सर्टिफिकेट नाही म्हणून रुग्णालयाबाहेर गरोदर महिलेला ताटकळत ठेवले

कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेल्या महिलेला केवळ अहवालाचे सर्टिफिकेट म्हणजेच पुरावा नाही म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका रुग्णालयाबाहेर गरोदर महिलेला ताटकळत ठेवण्यात आले. अखेर प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयाबाहेर भररस्त्यात त्या महिलेची प्रसूती झाली.

आजरा तालुक्यातील साळगाव येथे माहेरी प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला बाळंतपणासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करून घेतले नाही. तेथून नेसरी येथे नेले असता तेथेही नकार दिल्याने आजरा शहरातील एका रुग्णालयात आणले. या ठिकाणी गडहिंग्लज येथे दिलेल्या रिपोर्टमध्ये ही महिला निगेटिव्ह असल्याचे पण त्याबाबतचा पुरावा म्हणून सर्टिफिकेट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. गडहिंग्लज येथे चौकशी केली असता ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे समजले. महिलेची स्थिती बघून कार्यकर्ते प्रभाकर कोरवी यांनी डॉक्टरांना परिस्थिती सांगितली. डाॅक्टरांनी चौकशी केली. त्यांना घोळ समजला. पण त्याकडे दुर्लक्ष करत महिलेची तपासणी करत असतानाच तिची प्रसूती झाली. बाळंतपणानंतर बाळ व आई सुखरूप असल्याने सर्वांनीच नि:श्वास सोडला.

0