आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांसमोरच आला हृदयविकाराचा झटका:नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे आल्यावर घडला प्रकार; CPR देऊन काही सेकंदात वाचवला जीव

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरमध्ये नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे आलेल्या रुग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्ण बेशुद्ध पडला. यानंतर डॉक्टरांनी त्यांचा अनुभव पणाला लावत सीपीआर देऊन जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

कोल्हापूर येथील ही घटना आहे. रुग्ण नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला होता. बोलत असतानाच रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. डॉ. अर्जुन आडनाईक यांनी तत्काळ रुग्णाच्या छातीवर दाब दिला. त्यामुळे काही सेकंदातच तो शुद्धीवर आला.

म्हणून पेसमेकर लावला

वैद्यकीय अहवालानूसार, या रुग्णाचे हृदय नीट काम करत नव्हते. या रुग्णाला 12 वर्षांपूर्वी पेसमेकर बसवण्यात आला होता. नियमित तपासणी आणि नवीन पेसमेकरसाठी रुग्ण डॉ. अर्जुन यांच्याकडे गेले होते, पण त्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांच्या केबिनमध्ये हृदयविकाराचा झटका आला.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

डॉ. अर्जुन यांच्यासमोर आरामात बसलेला रुग्ण
डॉ. अर्जुन यांच्यासमोर आरामात बसलेला रुग्ण

महाडीकांनी शेअर केला व्हिडीओ

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली, असून संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, "हा व्हिडिओ आपल्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या वास्तविक जीवनातील नायकांचे उदाहरण आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांनी एका रुग्णाचे प्राण वाचवले. अशा सन्माननीय आणि सद्गुणी वीरांचे मी कौतुक करतो असेही त्यांनी नमूद केले.

काही लोक म्हणाले - हे योग्य सीपीआर नाही

या घटनेची पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर अमेरिकेत राहणारे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. शारीक शमीम यांनी लिहिले आहे की, मला माफ करा, पण छातीच्या धक्क्याने काहीही होत नाही. हे सीपीआर नाही आणि व्यक्तीच्या जाणीवेशी काहीही संबंध नाही.'' आणखी एका युजरने लिहिले की, "रुग्णाकडे जुना पेसमेकर होता. ज्याचे वय 14 वर्षे आहे. रुटीन चेकअप दरम्यान ते डॉक्टरांसमोर काम करणे बंद झाले. डॉक्टरांनी फक्त थाप मारून ते सक्रिय केले होते.

बातम्या आणखी आहेत...