आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:कलेसाठी मदतीचा हात पुढे, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबवला जातोय स्तुत्य उपक्रम

कोल्हापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरला कलापूर म्हणून जागतिक नकाशावर घेऊन जायचे छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न भवानी सामाजिक संस्थे ला पूर्ण करायचे आहे. मराठी मातीची जाण आणि ओळख रोमारोमांत भिनलेले कोल्हापूर कायमच कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिलेले आहे. भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या असो किंवा जगाला वास्तववादी चित्रपटांची ओळख करून देणाऱ्या तांबडी माती सारख्या कलाकृती या कोल्हापूरच्या माती ने जगाला दिलेल्या आहेत. आणि या कलाकृतींचा गाभा आहेत ते म्हणजे करवीरनगरीचे अनेक प्रतिभावंत कलाकार. महाराष्ट्राला अशा अनेक कलावंतांचा वारसा लाभलेला आहे ज्यातून अनेक कल्पना रुजून त्याची सृजनशील बीजं जगभर पसरली आहेत.

पण अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूरची आणि महाराष्ट्रातील मराठी कलावंतांची परिस्थिती खालावलेली दिसते, त्यांची अवस्था मोडकळीला आल्यासारखी दिसते. सध्याचे कोरोना किंवा इतरही अनेक कारणे यासाठी असू शकतात, पण एक प्रमुख कारण म्हणजे कलाकार वर्गाला असणारा राजाश्रय किंवा दातृ वर्गाचा आश्रय. आणि पहिल्यांदाच कलाकारांवर आपल्या कलेला आणि पर्यायाने स्वतःला प्रतिष्ठा मिळवून देण्याची, आपली गुजराण करण्याची जबाबदारी आलेली आहे. एका अर्थाने ही जमेची बाजू असू शकते, कारण यातून कलाकार स्वावलंबी होणे महत्वाचे आहे. पण या पार्श्वभूमीवर कला क्षेत्राला बऱ्याच बदलांना समोर जावं लागत आहेत. पण दुर्दैवाने या बदलांचा पोत समजणे कलाकारांना कठीण जात आहे. कारण घडणारे सर्वच आंतरिक, सामाजिक बदल आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात का हे बघणे काळाची गरज झाली आहे. मग यासाठी काय करता येईल असा प्रश्न चिंतेचा आणि चिंतनाचा होता. फक्त चिंतनाचाच नाही तर सन्मानाने स्वतःच्या बळावर स्वतः पोट भरण्याचा आणि जगण्याचा सुद्धा.

आपल्या मातीचे सुपुत्र डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि यांच्या सोबतच काही विशेषज्ञ लोकांशी चर्चा करून भवानी सामाजिक संस्थेने ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या चांगुलपणाच्या चळवळी बरोबर एक उपक्रम राबिवण्याचे ठरवले आहे.

याच्या पहिल्या टप्यात, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि देशातील कला क्षेत्रात पूर्ण वेळ काम करत असलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन एक नेटवर्क तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कलाकार श्रोत्यांशिवाय अपूर्ण असतो म्हणून त्यांची कला आणि प्रतिभा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं काम, विविध ऑनलाईन आणि हळुहळू ऑफलाईन प्रदर्शने आणि इतर बरेच उपक्रम, baramati.org या website द्वारे ही संस्था करणार आहे. त्याच बरोबर कलाकारांसाठी उपलब्ध असलेल्या स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, सरकारी तसेच बिगर सरकारी योजना, शिष्यवृत्त्या, फेलोशिप आपल्या मराठी कलाकारांपर्यंत पोहोचवणे; त्यासाठी त्यांना अर्ज करण्यासाठी मदत करण्याचे काम या संस्थेमार्फत आणि मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेल्या गिविंग बॅक मिशन तर्फे करणार आहोत. भरपूर सरकारी योजना आणि शिष्यवृत्त्या कलाकारांसाठी उपलब्ध असतात पण त्याचा लाभ घेतला जात नाही, कारण या योजना सामान्य माणसापर्यंत बऱ्याच कारणांमुळे पोहोचत नाहीत असे लक्षात आले. आणि म्हणूनच भवानी सामाजिक संस्था(Baramati.org) आणि गिविंग बॅक मिशन या कामासाठी पुढे येत आहे.

याच बरोबर, baramati.org एक सामाजिक उपक्रम म्हणून उभी राहत आहे. Crowdfunding द्वारे एक फंड गोळा करून त्या देणगी मिळालेल्या रकमेमधून प्रतिभावंत कलाकारांच्या कलाकृतीचा संग्रह करण्यास सुरुवात झाली आहे. यातून कलाकारांना आणि त्यांच्या कलेला योग्य आर्थिक मोबदला मिळावा आणि त्यांची कला सन्मानाने रसिकांपर्यंत जाऊ शकते. या कलाकृती बघण्यासाठी आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी एक आर्ट स्पेस आणि खुले व्यासपीठ सगळ्या लोकांसाठी समर्पित करत आहोत. दीर्घावधी मध्ये या संग्रहासाठी पन्हाळा येथे आपली खाजगी जागा सुद्धा या उपक्रमासाठी सौ. सुमन साळोखे अध्यक्षा - भवानी सामाजिक संस्था) यांनी उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात एकाही नवीन संग्रहालयाची बांधणी झालेली नाही. पन्हाळ्याला रिसॉर्ट किंवा हॉटेल बांधण्या बरोबरच असे काहीतरी उभारले तर, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कलाकारांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा तर मिळेलच पण प्रेक्षकांना पण रसग्रहण करून आपल्या जीवनाच्या इतर पैलूंमध्ये सौंदर्यदृष्टी आणण्यास प्रेरणा सुद्धा मिळेल. हे या उपक्रमाचे उद्धिष्ट आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्याच बरोबर स्थानिक आणि भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कलाकांबरोबर या क्षेत्रात सक्रिय आणि सकारात्मक सभाग घेता यावा, यासाठी पण हे संग्रहालय समुदाय केंद्राचे म्हणजेच community hub चे काम करेल.

यासाठी शेवटी एक खूप महत्वाचे आणि कळकळीचे आवाहन मी वाचकांना करू इच्छितो. आधी म्हटल्या प्रमाणे कलाकार हा त्याच्या प्रेक्षकांशिवाय अपुरा असतो. आज कलेला लोकाश्रयाची गरज आहे. म्हणूनच आम्ही सध्या चालू केलेल्या funding campaign ला सढळ हाताने आर्थिक देणगी देऊन आपल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरला, कलापूर म्हणून परत नावलौकिक मिळवण्यासाठी सहभागी व्हा! आपल्या वाचकांमधील 1 लाख लोकांनी १०० रुपये इतकी जरी देणगी दिली तरी हा उपक्रम मोठ्या पातळीवर नेण्यासाठी आपली मदत प्रचंड मोलाची ठरेल.

Baramati.org एक सेवाभावी संस्था आहे, आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

हे campaign milaap.org वर verified म्हणजेच अधिकृत आहे. खाली दिलेल्या upi id वर googlePay, Paytm किंवा PhonePe द्वारे तुम्ही ऐच्छिक रकम पाठवू शकता.

UPI Scan :

खाली दिलेल्या खात्यावर पण तुम्ही देणगी जमा करू शकता.

Virtual account name: artist with their livelihood - Milaap

Account number: 2223330083979761

IFSC code: RATN0VAAPIS

Bank name: RBL

या उपक्रमा शी संबंधित सर्व माहिती आम्ही Baramati. org या संकेतस्थळा वर उपलब्ध करून देत आहोत. अधिक माहितीसाठी आणि कलाकारांना या network चा भाग व्हायचे असेल तर पुढील क्रमांकावर नक्की संपर्क साधावा: 9764148789

दायगो, 17 september 2020 कोल्हापूर

बातम्या आणखी आहेत...