आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:कराड शहरात लागलेल्या आगीत 25 घरे जळून खाक, आगीमुळे 4 सिलिंडरचा स्फोट; 3 महिला जखमी

सातारा | प्रतिनिधी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड शहरातील एका वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने सुमारे 25 घरे जळून खाक झाली आहे. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत तीन महिलांना दूखापत झाली आहे. कराड नगरपरिषद अग्निशामक दल तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

गेल्या दहा वर्षात या वस्तीत आग लागण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वीही आग लागून जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. काल मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या वस्तीत एकच खळबळ उडाली. अनेक महिला, लहान मुले आक्रोश करीत सूरक्षितस्थळी पळत होती. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बीआर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत सूचना केल्या. तत्पूर्वी माजी नगरसेवक फारूख पटवेकर, विजय यादव यांनी घटनास्थळावर आग विझवण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोठी मदत केली. अनेक घरातील साहित्यही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

कोर्ट ड्यूटीवर असणार्‍या होमगार्डची सतर्कता...

आग लागल्याने वस्तीतील काही रहिवासी, महिला यांनी रस्त्यावर पळत येऊन आक्रोश करताच येथील कोर्टात रात्रपाळीसाठी ड्यूटीवर असणार्‍या सूहास देवकर या होमगार्डने धाडसाने वस्तीत धाव घेत तेथील घरामध्ये घूसून अनेकांना जागे करीत घराबाहेर पडण्यासाठी मदत करुन अग्निशामक दलाला सूचना दिली. दरम्यान, संपूर्ण वस्तीत आग पसरल्याने अनेकांनी संसार घडल्यावर आली, मात्र त्यांना परिसरातील माजी नगसेवकांच्या मदतीने शाळा क्रमांक तीनमध्ये तात्पूरता ​​​​​​​आसरा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...