आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैन्य दलात भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कराड तालुक्यातील कोळे गावात घडली. दयानंद बाबूराव काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सैन्यात कार्यरत जवान असलेल्या मृताचा चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे याच्यावर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी प्रदीप काळेला अटक केली आहे. मृताचा भाऊ शिवानंद बाबूराव काळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी प्रदीपने सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवत भाऊ दयानंदकडून वेळोवेळी ऑनलाइनद्वारे सुमारे ९ लाख रुपये उकळले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.