आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे पदवीधर:दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरच भवितव्य; भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यासह एकूण 62 उमेदवार निवडणूक रिंगणात

सांगली | गणेश जोशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिजित बिचुकले पुन्हा मैदानात

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच प्रतिष्ठेची केल्याने या मतदारसंघात प्रचाराची मोठी रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यासह या दोन उमेदवारांच्या सोबत एकूण ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघातील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते कोण घेणार यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीवर एक नजर टाकली तर ही निवडणूक केव्हा होते आणि कोण विजयी होतो. याकडे फारसे राजकीय गांभीर्याने पाहिले जात नव्हते. मात्र, यंदा होणारी ही निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी ठरणारी आहे. तसेच या मतदारसंघावर कब्जा करून राष्ट्रवादी पश्‍चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. याबरोबरच आजपर्यंत या मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे. तोही बहुजन मतदारांना एकत्रित करीत उद‌्ध्वस्त करण्याचे डावपेच आखले जात आहेत.

१ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यांत एकूण ८७ हजार २३३ मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी होईल. या निवडणुकीत तब्बल ६२ उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याने एक मोठी मतपत्रिका असणार आहे. निवडणुकीसाठी प्राधान्य क्रमाने मतदान करावे लागणार असल्याने या मतदान प्रक्रिया खूपच धिम्या पद्धतीने होईल, असा अंदाज आहे.

अभिजित बिचुकले पुन्हा मैदानात
मराठा समाजाचे नेते श्रीमंत कोकटे, आम आदमीचे डॉ.अमोल पवार, मनसेकडून अॅड. रूपाली ठोंबरे, कॉम्रेड शंकर पुजारी, सातारा येथील अभिजित बिचुकले हे गेल्या काही वर्षात विविध निवडणुकीत उतरून प्रसिद्धी मिळवतात. तेच आता पुन्हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्याच नावाचे पुण्याचे अरुण (अण्णा) लाड, हेमंत जगताप, विजयकुमार पाटील, अॅड. राजू चव्हाण, मानसिंग जगताप, सुमित संकपाळ आदी विविध नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser