आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडून मृत्यू:साताऱ्यात दोन विविध घटनांत एक तरुण, एका वृद्धाचा बुडून मृत्यू

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. क्षेत्र माहुली येथे अंघोळीला गेल्यानंतर पाय घसरून कृष्णा नदीच्या पात्रात पडलेल्या दिनकर रामचंद्र पवार (८०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत अवसरी (ता. पाटण) गावातील दत्ता रघुनाथ शिर्के (२२) हा तरुण शनिवारी (दि. ३) म्हैस धुवायला तलावात गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. स्थानिकांनी दोन दिवस त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमने त्याचा शोध घेतला.

बातम्या आणखी आहेत...