आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:प्रियकरासोबत भांडण झाल्याने लातूरच्या तरुणीचा इस्लामपूरच्या बारमध्ये धिंगाणा

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लातूरची प्रेयसी आणि इस्लामपूरच्या प्रियकराने येथील बिअर बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत प्रचंड धुमाकूळ घातल्याची घटना बुधवारी घडली. या वेळी बार मालकाने सुरुवातीला तिला समजावून सांगितले. मात्र, ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी तिची थेट तुरुंगात रवानगी केली.

संबंधित तरुणी दोन दिवसांपूर्वी प्रियकराला भेटण्यास इस्लामपुरात आली होती. त्यानंतर दोघेही दुपारी इस्लामपूर येथे वाघवाडी फाट्या रस्त्यावरील एका बिअर बारमध्ये गेले. या वेळी दोघांनीही यथेच्छ मद्यप्राशन केले. काही वेळानंतर दोघांत वाद झाला. त्यामुळे घाबरलेला प्रियकर बारच्या बाहेर निघून गेला. त्या वेळी दोघांमधील वाद या तरुणीने आरडाओरड करून सांगण्यास सुरुवात केली. नंतर तिने रस्त्यावर येऊन धिंगाणा केला. पोलिसांनी तिला ठाण्यात नेले. मात्र, तिथेही तिचा धिंगाणा सुरूच होता, असे इस्लामपूर पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...