आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून:‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेचा गळा दाबला, नंतर तिच्या दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले

सातारा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने सोबत राहणाऱ्या (लिव्ह इन) महिलेसह दोन मुलांचा गळा दाबून खून केला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव वेलंग शिरंबे येथे ही घटना गुरुवारी (१६ जून) उघडकीस आली.

पोलिसांनी दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव, ता. जि. उस्मानाबाद; सध्या रा. वेलंग (शिरंबे) जि. सातारा) याला अटक केली आहे. दत्तासोबत योगिता दत्ता नामदास (३८) दोन मुलांसह राहत होती. तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने योगिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर योगिताच्या तनू आणि समीर या दोन्ही मुलांना झोपेतून उठवले आणि मळ्यातील विहिरीत ढकलून दिले. तिघांचे खून करून घराला कडी लावून तो निघून गेला. अकलूज पोलिसांनी दत्ताला त्याच्या मूळ गावात अटक केली.

बातम्या आणखी आहेत...