आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई;:साताऱ्यामध्ये अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई; सुमारे 3 लाखांची अफू जप्त

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

। फलटण तालुक्यातील मुळीकवाडी गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याच्या मालकीच्या शेतात अमली पदार्थ अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेतात छापा घातला असता, एकूण २७३७ झाडांची लागवड करून त्याची केल्याचे आढळून आले. त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकांमध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले. त्याच्याकडे अमली पदार्थ अफूचा एकूण २ लाख ७७ हजार २०० रुपयांचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी दिली असून, सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय एस. एन. पवार या करीत आहेत.