आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:आत्महत्येनंतर बोलणे, निव्वळ काथ्याकुट; अभिनेता सयाजी शिंदे यांचे मत

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

'आत्महत्या कोण कधी करेल हे जगात कुणालाच समजलेले नाही. जेव्हा तो क्षण असतो तो कुणाच्याच हातात नसतो. त्यानंतरचे बोलणे निव्वळ काथ्याकुट आहे. कुठला शेतकरी केंव्हा आत्महत्या करेल हे ही सांगता येत नाही. सर्वकाही असतानाही श्रीमंत माणूस आत्महत्या करतो. आत्महत्येचा विचार येणे त्याचे माईंड विचलित होणे हे कधी समजुन येत नाही. कुत्र्या मांजरालाही कळते आत्महत्या करू नये मग माणसाला का कळू नये' असे मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

पर्यावरण विषयक जनजागृती करणाऱ्या फ्रायडेज फॉर फ्युचर या संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे बोलत होते. त्यांच्या हस्ते पर्यावरणविषयक जनजागरण करणाऱ्या एका व्हिडिओ शुभारंभ आज कोल्हापूरात झाला. आपण स्ट्राॅंग कसे रहायचे हे निसर्गाकडून शिकले पाहिजे. जुन्या झाडांचा शोध लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. जिल्ह्या जिल्ह्यातील व राज्यातील टाॅप टेन झाडे वारसा म्हणून जतन करावीत. आमदार, खासदार, अभिनेता, लेखक हे कोणी सेलिब्रिटी नसून आपल्याला 200 ,300 वर्षे आॅक्सिजन देणारी ही झाडेच खरी सेलेब्रिटी आहेत.

मानवी ढोंगीपणावर आसूड ओढले. लहान मुलांनी मोठ्यांना वास्तवाची जाणीव करून द्यायची वेळ आपण आणली आहे, याचे दुःख व्यक्त करून प्रत्येकाने स्वतः बदलास सुरुवात करावी, असे त्यांनी आवाहन केले. आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी 5 झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्था वृक्ष बँक सुरू व्हावी. शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हीच त्या भागातील सेलिब्रेटी व्हायला हवीत.

खरं तर वाघांना माणसं खायला टाकली पाहिजेत

वाघांनी किती माणसांना मारले आणि माणसांनी किती वाघांना मारले एवढा हिशोब केला तरी कळेल की माणूस किती वाईट आहे. त्यामुळे खरं तर वाघांना माणसं खायला टाकली पाहिजेत अशी परिस्थिती आहे. पूर्ण इतिहास पाहिला तर माणूसच प्राण्यांना जास्त मारुन खातो त्यामुळे माणसाने माणूसपण तपासायला हवे आणि तसे जगायला हवे असेही मत शिंदे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...