आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकाउंट हॅक:'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंगडेचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकरने केली पैशाची मागणी

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूर सायबर क्राईमकडे धोंगडे कडून तक्रार

'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंगडे उर्फ सुमी हीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. इतकेच नाही तर हॅकरने अमृताकडे पैशांची मागणी केली आहे. यासर्व प्रकाराबाबत अमृता धोंगडे हीने कोल्हापूर सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.पोलिस तपास करीत आहेत.

स्वत:चे खाते हॅक झाल्याची पोस्ट तिने फेसबुकवर पोस्ट केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे अमृता कोल्हापूरात वास्तव्यास आहे. अमृता धोंगडे हीला आलेल्या ई-मेलवरून तिने स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट अपडेट केले. अपडेटनंतर हॅकरने तिला अकाऊंट हॅक झाल्याचे सांगत पैशांची मागणी केली.

अभिनेत्री अमृता धोंगडे हीच्या अकाऊंटला 77 हजार फॉलोअर्स आहेत, याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संबंधिताने केला. याबाबत अभिनेत्री अमृता धोंगडे हीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार अर्ज दाखल केला आहे.

अफवांना बळी पडू नका : अमृताची पोस्ट

अमृताने फेसबुक वर पोस्ट करुनही अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये तीने 28 ऑगस्टला एक मेल आला इन्स्टाग्राम व्हेरीफिकेशनसाठी त्यानंतर लगेचच व्हाट्सअप वर मेसेज आला तो नंबर Turkey चा होता पण मला वाटलं तो खरंच इंस्टाग्राम वेरिफिकेशन साठी मेसेज आहे म्हणून त्यांनी मला एक लिंक पाठवली या लिंक वर जाऊन चुकून मी माझं युजर नेम आणि पासवर्ड दिला आणि थोड्या वेळाने माझा अकाउंट मला दिसणे बंद झाले. त्यानंतर त्याने दुसऱ्या एका नंबर वरून मेसेज केला की तुझा अकाऊंट हे आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही जेवढे पैसे सांगतोय तेवढे दे आणि तुझा अकाउंट तुला परत घे. त्यांनी मला 40,000 ची मागणी केली. माझे इंस्टाग्राम वर फॉलोवर्स हे 77.6k एवढे होते. त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करेन प्लीज मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, व कोणत्याही अफवांना बळी पडू नका अशी विनंती केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser