आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ मंदिरे खुली करण्याचे करण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट आकर्षक रांगोळीच्या मांडणीसह सोमवारी सकाळी नऊ वाजता सर्व भाविकांसाठी खुले झाले. अंबाबाई दर्शनाचा पहिला मान कोव्हिड योध्यांना देण्यात आला. यावेळी पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी आलेल्यांचे स्वागत केले. तसेच आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मंदिर खुले झाले असले तरी भाविकांना केवळ सहा तासात दर्शन घेता येणार आहे. देवस्थान समितीने दर्शनासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी 4 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन वेळ निश्चित केली आहे. सध्या भाविकांना मंदिरात पूर्व दरवाजातून प्रवेश करता येणार आहे. तसेच गाभाऱ्यात थेट प्रवेश न देता कासव चौकातून दर्शन घेऊन दक्षिण दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय केली आहे. कोरनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना भक्तांना ऑटोमॅटिक सॅनिटायझर दिले जाते तसेच तापमान तपासणी ,आवारात मास्क नसल्यास प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अख्त्यारीतील प्रमुख अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग , सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3042 मंदिरे आज खुली झाली.
मंदिर प्रवेशासाठीची नियमावली अशी
- भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार
- दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार
- पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग राहणार
- मंदिराच्या आतील आवारातील दुकाने बंद राहणार
- भाविकांना कासव चौक-पितळी उंबऱ्या पासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे लागणार
- भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही
- मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर चा वापर करूनच प्रवेश मिळणार
- मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही
- मंदिर आवारात कोणत्याही भक्ताने मास्क काढला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार
- 10 वर्षा खालील लहान मुलं आणि जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तूर्तास दर्शन नाही
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.