आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याधुनिक वागशीर पाणबुडी:नौदलाच्या पाणबुडीमध्ये कराडमधील श्री रेफ्रिजरेशनची वातानुकूलित यंत्रणा

सातारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नौदलात अत्याधुनिक वागशीर पाणबुडी दाखल झाली असून नुकतेच तिचे माझगाव डॉक यार्डातून जलावतरणदेखील झाले. ४० टक्के देशी तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेल्या या पाणबुडीत बसवण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणेची निर्मिती ही सातारा जिल्ह्यातील कराडसारख्या ग्रामीण भागातील सीएमडी आर. जी. शेंडे व कार्यकारी संचालिका राजश्री शेंडे यांच्या श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीजमध्ये झाली आहे. यामुळे कराडच्या औद्योगिक उत्पादनावर जागतिक दर्जाची मोहोर उमटली आहे. आयएनएस वागशीर ही पाणबुडी नौदलाच्या पाणबुडी प्रोजेक्ट ७५ अंतर्गत बांधण्यात आलेली आहे. यापूर्वी पाणबुडीला फ्रेंच कंपनीची वातानुकूलित यंत्रणा वापरली जात होती.

बातम्या आणखी आहेत...