आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:राज्यात ठराविक आमदारांना सांभाळण्याचे काम सुरू; अजित पवारांचा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल

सातारा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात ठराविक आमदारांना सांभाळण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. ते आज साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे फडणवीसांचे सरकार येऊन जून महिन्यात 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी काय केले असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. बाजार समीतीच्या निवडणुकीत पैशाची उधळपट्टी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. कोरेगावात पोलिस निरीक्षक येण्यास तयार नाही, ही काय परिस्थिती आहे. राज्यात काय मोगलाई लागकून गेली आहे का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना अमानूष मारहाण जिल्ह्यात सुरू आहे, असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे. आम्ही पालकमंत्री असताना असे काही झाले नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यात ठराविक आमदारांना सांभाळण्याचे काम सुरू आहे. बदली करण्यासाठी रेट कार्ड ठरले आहे. सत्ता असताना माज आणि मस्ती नसायला हवी, आम्ही तसे नाही वागलो म्हणून अधिकारी आमचे काम करतात. या सरकारमध्ये तसे होताना दिसून येत नाही. मंत्री कधीच मंत्रालयात बसलेले दिसून येत नाही. राज्यभरात अनेक लोक फिरताना दिसून येतात जे विचारतात हे काम करुण पाहिजे का? असे करुण द्या, ही परिस्थिती राज्याने कधी पाहिली नव्हती ती आता झाली आहे.

अजित पवार म्हणाले की, राज्यपाल ते राज्यकर्ते महा पुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करत आहेत. पण काहीच कारवाई नाही, असे वातावरण राज्यात आहे. राज्य सरकारने लोकांसाठी काही कामे केलेली दिसून येत नाही. साताऱ्यामध्ये कंत्राटदाराला काम करु दिले जात नाही, ते कसे काम करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या काळात लोकप्रतिनिधीनी कुणालाच त्रास दिला नाही.