आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येकाचे काही श्रद्धास्थान असतात. तेथे तो जात असेल तर त्याला काही हरकत नाही. मात्र, जाती-जाती, धर्मांवरुन माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
मी देवदर्शनाला जाताना सांगतही नाही
अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरुन एकनाथ शिंदेंना टोला लगावला. अजित पवार म्हणाले, मी देवदर्शनाला जाताना कधी सांगतही नाही. मात्र, आता मीडियाच एकनाथ शिंदे आता उठले, आता बसले, त्यांच्या विमानाने आता टेक ऑफ घेतले, लँड केले, अशा काहीही बातम्या दाखवत राहतात. माझे कितीतरी सहकारी तिरुपतीचे दर्शन घेऊन येतात. ते प्रसाद देतात तेव्हाच कळते की हे जाऊन आले आहेत. त्याची एवढी प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, अयोध्या दौऱ्यासाठी त्यांना शुभेच्छा. श्रद्धा असेल तेथे जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, जातीधर्माचा वापर करुन माणसामाणसात फूट पाडू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.
नॉट रिचेबलमुळे संतापले
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत का?, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता अजित पवार चांगलेच भडकले. मला स्टॅम्प पेपर आणून द्या. त्यावर मी तुम्हाला नॉट रिचेबल का होतो, हे लिहून देऊ का?, असे खडेबोल अजित पवारांनी सुनावले. तसेच, या विषयावर एकदा मी स्पष्टीकरण दिलेले आहे. ते सर्व महाराष्ट्राने ऐकले आहे. त्यावर वारंवार स्पष्टीकरण देणे मला गरजेचे वाटत नाही व आवडतही नाही, असे अजित पवारांनी सुनावले.
खोकेबहाद्दर असल्याची कबुली
अजित पवार म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक रॅप सिंगर राज मुंगसे याला खोक्यावरून रॅप साँग केले म्हणून उचलून त्याला तुरुंगात डांबलेले सर्वांनी पाहीले. मुळात त्या रॅपमध्ये त्याने कुणाचेच नाव घेतले नव्हते. तो बिचारा फक्त खोक्यावरून गाणे गात होता. पण या महाभागांनी तर ते खोकेबहाद्दर आहेत याची एकप्रकारे स्वतःहून कबुलीच दिली. हल्ली खोका म्हटले तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या डोळ्यासमोर कोण येत ते आता सर्वांना माहिती आहे.
संबंधित वृत्त
शिंदे, फडणवीसांवर टीकास्त्र:राज्यात गारपीट असताना सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला, मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी हिंदुत्वाचा अजेंडा- शरद पवार
राज्यात वादळी पाऊस, गारपीट असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. राज्याचे, देशाचे मुख्य प्रश्न सोडवण्यची दृष्टी ज्यांच्याकडे नाही, असे लोक लक्ष विचलीत करण्यासाठी असे काही तरी प्रकार करतात, अशा शब्दांत राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.