आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कार्यकर्ते बरोबर राहावेत, आपल्या आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून सरकार पडणार, असे गाजर दाखवावे लागते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला लगावला आहे.
पुढील दोन महिन्यांत भाजप सरकार येईल, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणी येथील भाजप मेळाव्यात सोमवारी केले होते. दानवेंप्रमाणेच भाजपचे इतर नेतेही महाविकास आघाडी सरकार आपल्याच कर्माने पडणार असल्याचे वक्तव्य वारंवार करीत आहेत. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथे त्यांच्या स्मृतिस्थळी सरकारच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी केली आहे. त्यांचे आशीर्वाद आघाडीच्या पाठीशी आहेत तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
59 हजार कोटींची वीज बिल थकबाकी
सर्व प्रकारची मिळून ५९ हजार कोटींची वीज बिल थकबाकी झाली आहे. २०१४ पर्यंत आम्ही सत्तेवर होतो. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आले. आमच्या सत्तेच्या काळात किती थकबाकी होती आणि नंतर किती वाढली, हे पहा. कररूपातील जीएसटी परताव्याचे २९ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे अजून बाकी असल्याचे सांगून वन नेशन वन टॅक्स हा जीएसटीचा नवीन कायदा लागू करताना केंद्र सरकारने जे शब्द दिले होते, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही,असे पवार म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.