आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित दादांचा चंद्रकांत दादांना टोला:'काही लोकांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी झाली आहे'

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना चाचण्या दुप्पट करा, पहिल्या लाटे प्रमाणे जिल्हा प्रशासनाने काम करावे अशा सूचना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी बोलताना पवारांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. चंद्रकांत दादा सत्तेत नसल्यामुळे त्यांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. काही लोकांना काही माहीत नसताना काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

गरज पडल्यास निर्बंध अजून कडक करणार
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह रेटनुसार राज्यात कोल्हापुरात कोरोना रुग्णांचा प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही. आपल्या जिल्ह्यातील कोरोना कमी करण्यासाठी कोल्हापूरकरांनी सहकार्य करावं, असे आवाहन अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी पवार यांनी जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रेट वाढला तरी काही हरकत नाही पण टेस्ट दोन पटीने वाढवा अशा सुचना जिल्हा प्रशासनाला केल्या.

तसेच, यावेळी त्यांनी नागरिक हे पोलिसांना पाहून मास्क घालतात असे म्हणत नाराजी व्यक्त करत गरज पडल्यास आणखीन कडक निर्बंध करणार असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी त्यांनी जिल्हाप्रशासनाला किंवा शासनाला काणालाही त्रास द्यायचा आमचा हेतू नाही. खासगी रुग्णालयांनी उपचार करताना आवाजावी बिल घेऊ नये असे म्हटले आहे.

मराठा आरक्षणाबाबत लवकरच मार्ग काढला जाईल
मराठा आरक्षणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सर्वच घटकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. राज्य सरकार मार्ग काढत आहे. सेवानिवृत्त चिफ जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाबाबत अहवाल तयार केला जात आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याबाबत बोलताना ते म्हणाले, जिथे कुंभमेळा झाला तिथे कोरोना वाढला, जिथे निवडणूक झाली तिथे कोरोना वाढला हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वारकरी संप्रदायाशी आमची चर्चा झाली आहे. कोरोना आहे म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत नाहीतर आम्हीही पालखीचे स्वागत केले असते.

बातम्या आणखी आहेत...