आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लढा कोरोनाशी:राज्यभरात 55 वर्षांवरील सर्वच नागरिकांची तपासणी : मुख्यमंत्री, सप्टेंबरपासून ‘चेस द व्हायरस’चा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री

पुढील महिन्यात कोरोनाविरुद्ध ‘चेस द व्हायरस’चा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत ५५ वर्षावरील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून ज्यांना हृदयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले. सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १० ग्रामीण रुग्णालय व दोन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सुदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ महाराष्ट्र घडवूया. स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन परस्पर सहकार्याने काम करून कोरोनाला नक्की हरवू, या असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रुग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या
राज्य सरकारही आवश्यक ती सर्व मदत करणार

कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रुग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री
- मुंबईतील जिमचालकांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जिम सुरू करताना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे.
- सर्वांनी एकत्र येऊन लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरविणे आवश्यक आहेत. ती शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.
- राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तज्ज्ञांची सेवा
मुख्यमंत्री म्हणाले, आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू कक्षात आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. दुर्गम भागात सेकंड ओपिनियन, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल जगभरातील तज्ज्ञांची सेवा टेलिमेडीसिनच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल.