आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव:अमित शहा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट नाकारली; सीमाभागातील मराठी भाषिकांचा अपेक्षा भंग

कोल्हापूर | प्रिया सरीकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. 1956 पासून संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र झाला. त्यानंतर प्रत्येक वर्षी बेळगावात 17 जानेवारीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. सीमाभागात हुतात्मा दिन होणार आहे.दरम्यान यावेळी हुतात्मा दिनीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावात दाखल होणार असल्यामुळे बेळगाव सीमा भागातील तमाम मराठी भाषिकांचे अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्याकडे लक्ष वेधून राहिले होते. रविवारी (दि.१७) होणार्या अमित शहा यांच्या दौर्यादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटीसाठी वेळ मिळावा अशी मागणी समितीने पत्राद्वारे केली होती. पण अमित शहा यांनी भेट नाकारली. भेट मिळावी यासाठी समितीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून विनंती केली होती, तरीही एकीकरण समितीला बगल देत दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

17 जानेवारी रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्यांना अभिवादन केले जाते. यंदा हुतात्मा दिन कार्यक्रमानिमित्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करुन नियोजन केले आहे. यावर्षी हुतात्मा दिन केंद्रीय गृहमंत्री बेळगावात दाखल होत असल्याने, यावेळी भेट घेऊन सीमाप्रश्नाच्या संदर्भात आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांना जाणीव करून देणार होते. केंद्रीय गृहमंत्री शहा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेऊन चर्चा करतील अशी आशा होती मात्र समितीचा अपेक्षाभंग झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...