आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावादाचा भडका:अमित शहांचा सल्ला झुगारून कर्नाटकची दांडगाई; मराठी नेत्यांना सीमेवरच अडवले

सांगली/ कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगावकडे निघालेल्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व इतर मराठी लोकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलावरच रोखले. - Divya Marathi
बेळगावकडे निघालेल्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व इतर मराठी लोकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलावरच रोखले.
  • महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावचा मेळावा दडपशाहीने केला रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र व कर्नाटकात सुरू असलेल्या सीमावादात मध्यस्थी करत दोन्ही मुख्यमंत्र्यांना सबुरीचा सल्लावजा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संयमी भूमिका घेतली; पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांची दांडगाई मात्र कमी झालेली नाही.

कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी बेळगावात सुरू झाले, तिथे महाराष्ट्र एकीकरण समितीने दरवर्षीप्रमाणे मेळावा ठेवला होता, पण कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले. मेळाव्यास जाणारे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनाही प्रवेशबंदी केली. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह ३० जणांना सीमेवर अडवून अटक केली तसेच जमावावर सौम्य लाठीमारही केला..

खासदार मानेंना बेळगावात प्रवेशबंदी, मुश्रीफांसह आंदोलकांवर सौम्य लाठीमार
जमावबंदी अन‌् धरपकड

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यामुळे बेळगावात तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून कर्नाटक पोलिसांनी विधानभवन परिसरात जमावबंदी लागू केली होती. तसेच मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या एकीकरण समितीच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली.

कानडीत पत्र पाठवून बंदी
मी बेळगावला येणार असे कर्नाटक सरकारला हिंदीतून पत्राने कळवले होते. पण त्यांनी कानडी भाषेत पत्र पाठवून मला मनाई केली. दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पासपोर्ट घ्यावा लागतो काय? कर्नाटक सरकारची भूमिका चक्रावून टाकणारी आहे.
धैर्यशील माने, हातकणंगलेचे खासदार तथा अध्यक्ष, सीमा समन्वय समिती, महाराष्ट्र

महाराष्ट्र विधिमंडळातही पडसाद, विरोधकांनी जाब विचारला; पण मुख्यमंत्री म्हणाले, ‘राजकारण नको’
नागपूर

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास नागपुरात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार व अंबादास दानवेंनी दोन्ही सभागृहांत सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘दिल्लीतील चर्चेनंतरही कर्नाटक सरकार एेकत नाही. आमच्या आमदार, खासदारांना तिकडे जाण्यास बंदी कशी घातली जाते?’ मात्र पवार बोलत असतानाच अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले. त्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही सीमाबांधवांच्या पाठीशी आहोत. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे भान ठेवून यात राजकारण करू नये. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सीमाभागात जैसे थे परिस्थितीचे कर्नाटक पालन करत नसल्याचे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ. एकीकरण समितीच्या आंदोलकांच्या सुटकेसाठी सरकार कार्यवाही करेल.’

ट्वीट नेमके कुणाचे?
वादग्रस्त ट्वीट आपण केले नसल्याचे बोम्मई सांगत आहेत. एकनाथ शिंदेही ते मान्य करतात व लवकरच सूत्रधार समोर आणू, असा इशारा देत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी थेट टि‌्वटरचे प्रमुख एलन मस्क यांनाच टॅग करत ‘आपण टि‌्वटरचा राजीनामा देण्यापूर्वी बोम्मईंचे ट्वीट कुणी केले याचा निकाल द्या,’ असे ट्वीट करत टोलेबाजी केली

बातम्या आणखी आहेत...