आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून केले : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (7 जानेवारी) सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली.महाविकासआघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. याला आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत, अमित शाह यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य हे वैफल्यातून आले आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही, हे समजल्यामुळेच ते आता तक्रारी करत आहेत. अमित शाह यांनी आरोप केला आहे भाजपच्या कारखानदारांना सरकारकडून त्रास दिला जात आहे, परंतु तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी अभ्यास करून बोलायला हवे होते , असे म्हटले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, अमित शहा यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. सरकारने सगळ्याच कारखानदारांना थक हमी दिली आहे. कोणतीही गटबाजी केलेली नाही. भाजपच्या एका तरी कारखानदाराने सांगावं की त्यांना त्रास दिला जातो, आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत. कदाचित त्या कारखानदारांना अमित शाह यांच्याकडून पैसे घ्यायचे असतील, म्हणूनच त्यांनी हा बेबनाव सुरु केला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

काय म्हणाले होते अमित शाह?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं ढळढळीत खोटं बोलत असल्याचाचही दावा अमित शाह यांनी केला. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो, असे त्यांनी सांगितले.यावेळी अमित शहा यांनी नारायण राणेयांना भाजपमध्ये त्रास होणार नाही, त्यांचा योग्य तो सन्मान होईल, असे आश्वासन दिले. तर दुसरीकडे कोरोनाच्या काळातील महाविकासआघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच भाजपने युतीधर्म पाळला, कोणतेही वचन मोडले नाही, उद्धव ठाकरे हेच ढळढळीत खोटं बोलत असल्याची टीका अमित शाह यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...