आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेंना रोखले:छत्रपती संभाजी महाराजांना तुळजापूर मंदिराच्या गर्भगृहात न सोडल्याने संताप, समर्थकांनी आक्षेप घेतल्याने तणाव

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीराजेंनी सोमवारी (९ मे) रात्री ९ वाजेच्या सुमारास तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर संस्थानच्या नियमानुसार राजेंना चोपदार दरवाजातच रोखल्याबद्दल समर्थकांनी आक्षेप घेतल्याने तणाव निर्माण झाला. या वेळी संभाजीराजेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत जाब विचारला. दरम्यान, छत्रपती संभाजीराजेंना दर्शनापासून रोखल्याचे म्हणणे चुकीचे असून राजेंनी केवळ ५ फुटांवरून चोपदार दरवाजातून दर्शन घेतल्याचा मंदिर संस्थानने खुलासा केला आहे.

कुठलाही प्रोटोकॉल न पाळता छत्रपती संभाजीराजेंना गर्भगृहात दर्शनापासून रोखण्यात आले. या घटनेची तत्काळ दखल घेऊन मंदिर संस्थानचे सहायक जनसंपर्क अधिकारी व व्यवस्थापक तहसीलदार यांना तत्काळ निलंबित करून त्या ठिकाणी राजशिष्टाचाराचे पालन करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महेश गवळी, अजय साळुंके, प्रशांत सोंजी, अशोक फडकरी, भुजंग मुकेरकर, जीवनराजे इंगळे, धैर्यशील कापसे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...