आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत, पुरातत्वीय रसायन तज्ज्ञांनी मूर्तींची पाहणी करून व्यक्त केले मत

कोल्हापूर6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोरोना लॉकडाऊनचाही सकारात्मक परिणाम, गाभाऱ्यातील आर्द्रतेत कमालीची घट त्यामुळे मूर्ती अधिक सुरक्षित

करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाईची) मूर्ती ही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असुन मूर्तीची कोणतीही झीज झालेली नाही किंवा कोणताही धोका नाही. परंतू मंदिरातील श्री महाकाली व श्री महास्वरस्वती मुर्तींची झीज झाली असुन त्याचे संरक्षण करीता दोन्ही मुर्तीचे रासायनिक जतन प्रक्रिया (केमिकल कंन्झर्व्हेशन) करणे आवश्यक असलेचे उप अधीक्षक पुरातत्व रसायनतज्ञ पश्चिम क्षेत्र औरंगाबादचे श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने २०१५ मध्ये महालक्ष्मी मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले होते. आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुन्हा मूर्तीची पाहणी केली. मूर्ती सुस्थितीत असून केवळ देवीच्या चरणालगत थोडी झीज असून लवकरच याचे रासायनिक संवर्धन केले जाईल असे सांगितले. २०१७ मध्ये पाहणी केली होती त्यापेक्षाही सकारात्मक बाबी पुढे आल्या असून कोरोना लॉकडाऊन काळ मूर्ती संवर्धन प्रक्रीयेसाठी वरदान ठरला आहे असेही मिश्रा यांनी सांगितले.

संपुर्ण मंदिरामध्ये काही प्रमाणात कार्बनचा थर बसलेचे दिसत असुन तो काढून संपूर्ण मंदिर स्वच्छ करुन घेणे आवश्यक असलेचे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणेचे विलास वाहणे यांनी सुचित केले आहे. सदर थर टण्या टप्याने काढुन घेवुन मंदिराची इतर दुरुस्ती करणे आवश्यक असलेचे देखील सुचित केले आहे.

मंदिराच्या टेरेसवर मोठयाप्रमाणात असलेला कोब्याच्या थराचे पाहणी नंतर सदर काम हे फार अवघड व जोखीमीचे आहे, हा कोबा मंदिराच्या स्ट्रक्चरचा एक भाग बनला आहे त्यामुळे या संदर्भात आणखी सखोल अभ्यास करुन आवश्यक तपासण्या करुन त्यानंतर दुरुस्ती करणे योग्य होईल असे श्री वाहणे यांनी विषद केले.

मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाची पाहणी करून हे काम अत्यंत काळजीपूर्वक करावे अशा सूचना देण्यात आल्या. सिनिअर मॉडयुलर केंद्रीय पुरातत्व विभाग सुधीर वाघ , उप आवेक्षक कोल्हापूर उत्तम कांबळे हे देखील उपस्थित होते. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्र. उपअभियंता सुयश पाटील, लिपिक मिलिंद घेवारी, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...