आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:एमपीएससी परीक्षेत बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या फरारी संशयीतास अटक

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या २०१६ मध्ये झालेल्या मुलाखती वेळी बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडल्या प्रकरणी मुंबईतील आणखी एका संशयीताला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.

महेंद्र आनंद चेंबुरकर ( वय ६२, गावठाण चेंबुर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला १९ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच विजय सदाशिव बोरकर (वय २९ रा. शंभर फुटी रोड सांगली) याला अटक केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत २०१६ मध्ये मुलाखत झाली होती. या मुलाखती वेळी विजय बोरकर या उमेदवाराने नॅशनल टेम्पोलीन जिम्नॅस्टिक चॅम्पियन न्यू इंग्लिश स्कूल तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्र बद्दल एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना शंका आली होती. त्यामुळे आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रमाणपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी शंकर भास्करे या क्रीडा अधिकाऱ्यांकडे सोपवली होती. भास्करे यांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर विजय बोरकर यांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार शंकर भास्करे यांनी ८ जून 2020 रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विजय बोरकरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. जुना राजवाडा पोलिसांनी संशयित बोरकर याला अटक केली त्यानंतर चौकशीत चेंबुरकर यांचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला मुंबईत जाऊन अटक केली. चेंबुरकर हा राज्य फेडरेशन जिम्नॅशियम संघटनेचा सचिव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे हे करत आहेत.