आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीओ अधिकारी असलेल्या वराने डोक्यावर अक्षता पडताच दीड हजार वऱ्हाडींना रस्ता सुरक्षेची शपथ दिल्याने या विवाहाची चर्चा सध्या होत आहे. मूळ औरंगाबादचे असलेले अभिजित रिळे हे नुकतेच कोल्हापूरची कन्या डॉ. अभिलाषा पुरेकर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकले. डोक्यावर अक्षता पडताच अभिजित यांनी लग्नाला आलेल्या दीड हजार वऱ्हाडींना ५ मिनिटे थांबून राहण्याची विनंती केली. वधू-वरांनी एकमेकांना हार घातला अन् लगेच उपस्थितांना नवरदेवाने रस्ता सुरक्षेची शपथ दिली. इतकेच नाही तर उखाणा घेतानादेखील रस्ता सुरक्षेचा जागर करण्यास अभिजित विसरले नाहीत.
आरटीओ कार्यालय जालना येथे कार्यरत असलेले सहायक मोटार वाहन निरीक्षक अभिजित रिळे यांचा विवाह ४ डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूर येथे पार पडला. देशातील वाढती अपघात संख्या पाहता े रिळे हे रस्ता सुरक्षासंबंधी आपले कर्तव्य विवाहप्रसंगीसुद्धा विसरले नाहीत. त्यांनी स्वत:च्या विवाहप्रसंगी डॉ. अभिलाषासह सर्व उपस्थितांना रस्ता सुरक्षा नियम पालनाची शपथ देऊन कायम हे नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी या वेळी वऱ्हाडी मंडळींना केले.
नागरिकांनाही शपथ ^आमच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना १ जुलै २०२२ पासून रस्ता सुरक्षा नियम पालन करण्याची शपथ देत आहोत. कोरोनाकाळातील मृतांची आकडेवारी बघितली तर त्यापेक्षाही जास्त लाेक अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. माझ्या लग्नात माझेच लोक आले आहेत. नवरीकडील मंडळी नव्याने जोडली गेली आहेत. या सर्वांना मी रस्ता सुरक्षेची शपथ दिली -अभिजित रिळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.