आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कार्यकर्त्यांचा आक्रोष:पंकजा मुंडेंचे हे दबावतंत्र नाही, पंकजा असे काही करणार नाहीत; कार्यकर्त्यांच्या आक्रोषाला पक्षद्रोह म्हणता येणार नाही, भाजप नेते आशीष शेलार

कोल्हापूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर दौऱ्यात मंदिर बंद असल्याने शेलार यांनी अशा पद्धतीने महालक्ष्मीच्या प्रवेशद्वारावरुन मुख दर्शन घेतले. - Divya Marathi
कोल्हापूर दौऱ्यात मंदिर बंद असल्याने शेलार यांनी अशा पद्धतीने महालक्ष्मीच्या प्रवेशद्वारावरुन मुख दर्शन घेतले.

भाजपने मुंडे भगिनींना केंद्रीय मंत्रिमंडळातही डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांचे राजीनामे सत्र सुरू आहेत. दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसोबत मुंबईत मंगळवारी बैठक आयोजित केली. या बैठकीत पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात पंकजा मुंडे शक्तीप्रदर्शन करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असेही सांगितले जात आहे. पण, पंकजा मुंडेंच्या बैठका हे दबावतंत्र असूच शकत नाही त्या तसे करणार नाहीत असा विश्वास भाजप आमदार आणि नेते आशीष शेलार यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांच्या आक्रोषाला पक्षद्रोह म्हणता येणार नाही

भाजप नेते शेलार सध्या पश्चिम महाराष्ट्रात असून कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे आणि त्यांच्या नाराजीच्या बातम्यांवर आपले मत व्यक्त केले. पंकजा मुंडे कुठलेही दबावतंत्र वगैरे वापरत नाहीत. कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोष होतो. त्याला पक्षद्रोह म्हणता येणार नाही. स्वतः पंकजा मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यावर वेगळे काही बोलण्याची गरज नाही असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

नाना पटोलेंवर केली टीका
कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समाचार घेतला. नाना पटोले आपल्या विधानावरही ठाम राहत नाहीत. ते नेहमीच विधाने बदलत राहतात. ते आधी फोन टॅपिंगबद्दल बोलत होते. त्यांनी सभागृहात सुद्धा ही गोष्ट बोलून दाखवली. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचे विधान सुद्धा बदलले. एकीकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. दुसरीकडे विदर्भात गेले असतील आणि पुन्हा हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचे विधान बदलले तसेच त्यांनी केंद्राकडे बोट दाखवला. जो माणूस स्वत:च्याच विधानावर ठाम राहू शकत नाही त्याची केस टिकणार का? असा खोचक सवाल सेलार यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...