आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षणाचा तिढा:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी वेळ द्या, संभाजीराजेंनी मोदींना पाठवले 3 पत्र; पण अद्याप उत्तर नाही

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा समाजासाठी राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या घोषणा अपुऱ्या - संभाजी राजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी राजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ द्यावा यासाठी संभाजीराजेंनी तीन पत्र पाठवली आहेत. या पत्रावर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मात्र पंतप्रधानांकडून अद्याप त्या पत्रांचे उत्तर आले नाही. याबाबत टीव्ही नाईन मराठीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात अडकल्याने राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले. याबद्दल संभाजीराजेंनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. पण मराठा समाजासाठी राज्य सरकारने केलेल्या घोषणा अपुऱ्या असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ''सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळ यांच्यासाठी मदत जाहीर केली असली तरी मला आकडे काही पटलेले नाहीत. 32 टक्के मराठा समाजासाठी 130 कोटी अपुरे आहेत. किमान 1000 कोटी तरी द्यायला हवेत,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

कोरोना महामारी समजू शकतो, पण मराठा समाजाला काही ठोस द्यायचे असेल, सारथीला आपल्या पायावर उभे करायचे असेल, तर इतक्या कमी पैशात काही होणार नाही. मराठा आरक्षणावर सगळ्यांनी एकत्र बसून एक धोरण तयार करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठी आरक्षणात तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.