आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाचे आदेश:पानसरे हत्याप्रकरणी एटीएस हजर व्हा

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस) कडे देण्यात आला आहे. त्यामुळे यासंबंधीची सुनावणी कोणत्या अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायालयात चालणार याची स्पष्टता ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून द्यावी, असे आदेश मंगळवारी जिल्हा न्यायालयाने दिले. याबाबतची पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला ठेवली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले.

पानसरे यांच्या हत्येबाबत मंगळवारी जिल्हा न्यायाधीश-३ एस.एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी संशयित आरोपींच्यावर दोषारोपनिश्चिती करण्यात येणार होती. दरम्यान, येरवडा कारागृहातून ३ संशयितांना न्यायालयात आणले. पण बंगळुरू कारागृहातून इतर ६ संशयितांना आणण्यास उशीर झाल्याने सुनावणी अर्ध्या तासासाठी तहकूब केली.

बातम्या आणखी आहेत...