आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवे मारण्याचा प्रयत्न:जेवणात विष कालवून जिवे मारण्याचा प्रयत्न, पत्नी अटकेत, याहीपूर्वी दोन वेळा केला होता जिवे मारण्याचा प्रयत्न

सांगली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीला जेवणातून व खाद्यपदार्थामध्ये विष कालवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इस्लामपूर तालुक्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्न खंकाळे हिला अटक करण्यात आली. गौरी हिने आपला पती प्रसन्न खंकाळे (३०) याला १७ मार्च रोजी विष घातलेले गुलाबजामून आग्रहाने खायला दिले. पण प्रसन्न याला काहीसा संशय आला. त्याने गुलाबजामून खाण्यास नकार दिला. त्याने पत्नीला धमकावल्यानंतर तिने गुलाबजामूनमध्ये उंदीर मारण्याचे औषध घातल्याचे सांगितले.

त्याआधीही त्याच्या जेवणाच्या डब्यात तिने फिनेल घातले होते. तसेच चहामध्येही विषारी द्रव्य घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गाैरी हिला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ३०७ व ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...