आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला:म्हणाले- आहात तिथे सुखाने नांदा, पण होऊ नका देऊ वांदा, झेंड्यातील रंगांवरून राज ठाकरेंवरही टीका

सांगली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने पाप केलं आणि भाजपा सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एका बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. मी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. पण ते अजून तर बाहेर आले नाही. पण तुम्ही सुखाने आहे, तिथं नांदा पण तुमचा होऊ देऊ नका वांदा, अश्या शब्दात आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

आपली भीम जयंती, गणेशोत्सव, नवरात्र याचा त्रास मुस्लिम समाजाला होत नाही का? मग त्यांना पण त्रास होता कामा नये. तुम्हाला सुद्धा अजानचा त्रास होता कामा नये. जर तुम्हाला अजान ऐकायची नसेल तर ऐकू नका, पण दादागिरीची भाषा वापरणे योग्य नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. हिंदु- मुस्लिमांना तोडण्याऐवजी जोडले पाहिजे, असे आठवले म्हणाले.

पुढचा मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा व्हावा -

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो या विधानावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे यांच्या मताशी मी सहमत आहे. पुढचा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा व्हावा आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे मतदेखील रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरेंना रंग बदलायची सवय -

रामदास आठवलेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. राज ठाकरे हे शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या झेंड्यामध्ये भगवा, हिरवा, निळा पांढरा रंग होता. मग त्यांनी मनसेच्या झेंड्यातील सगळे रंग काढले. तुम्हाला रंग बदलायची सवय आहे का? आता फक्त भगवा रंग शिल्लक आहे. पण भगवा हा शांतीचे प्रतीक आहे. भगवा आग विझविण्याचे काम करतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी आग लावायचा प्रयत्न करू नये, असे आठवले म्हणाले. तसेच भाजपा-मनसे युतीची शक्यता रामदास आठवले यांनी फेटाळली. राज ठाकरे यांच्याबरोबर युती करणे हे भाजपाला परवडणारे नाही, असे ते म्हणाले.

शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोरेगाव-भीमा दंगल व्यवस्थित हाताळली नाही, असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दंगल हाताळली आणि महाराष्ट्रात इतर कोणत्याही जिल्ह्यात दंगल होऊ दिली नाही, असे ते म्हणाले.

शिर्डीत झालेल्या पराभवांची आठवलेंना आठवण -
रामदास आठवले यांनी शिर्डीत झालेल्या पराभवावर भाष्य केले. आपल्याला हरवण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यानंतर बाळासाहेबांनी मला शिवसेनेत घेतलं आणि शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र केली. शिवसेनेला सत्ता मिळाल्याचे ते म्हणाले. 2009 साली रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यात काँग्रेसचे तत्कालीन मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळेच आठवलेंचा पराभव झाल्याच्या वावड्या त्यावेळी उठल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...