आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नदी प्रदुषण टाळण्यासाठी कोल्हापूरात चक्क म्हशींचे पार्लर; कॅटल सर्व्हीस आणि दुध कट्टाही

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूरच्या म्हशींचा डौल न्यारा, करती पार्लरचा नखरा...

तिची डौलदार चाल...तिचे ते वळून पाहणे...तिची कातील नजर आणि तो नखरा...खरंच तिचा नाद खुळा..... हे वर्णन तरुणीचे नाही बरं... कोल्हापुरातील ब्युटीपार्लर मधून बाहेर पडलेल्या म्हशींचे आहे. होय तर कोल्हापूर शहरातील पेठेतील पारंपरिक दुध कट्टे सर्वांना माहितच, पण आता त्यांनी म्हशींना स्वच्छ करण्यासाठी चक्क पार्लर सुरू झाले आहे.

कान हलवत, अंग झटकत इथे म्हशींच्या अंगावर पडणाऱ्या पाण्याच्या धारेचा आनंद घेतात. म्हशीचा मालक हातातल्या चोथ्याने म्हशीचे अंग हळुवार घासून स्वच्छ करतो. त्यामुळे म्हशीचा काळा रंगही चकाकुन निघतोय. म्हशींचे असे नखरे सध्या कोल्हापुरात सुरू आहेत. कोल्हापुरातल्या म्हशींसाठी मंगळवार पेठेतील बागेत अशी मोफत सेवा सुरू केली आहे. पंचगंगा नदी, रंकाळा, कोटितीर्थ, कळंबा तलाव म्हशी धुतल्या तर तो पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा ठरतो. त्यावर उपाय म्हणून बेलबागेत चक्क म्हशीसाठी शॉवर बाथ, ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले आहे. कोल्हापुरातील गाई-म्हशी नदी तलावातील पाण्यात धुवू नयेत, ही यामागची भावना आहे. कोल्हापूर महापालिका व डीपीडीसीच्या माध्यमातून हा शॉवर बाथ उभा राहिला आहे.

म्हशींना पाणवठ्यावर सोडण्यास निर्बंध आल्यामुळे त्यांनी उद्घाटन वगैरे न करता हे बाथ सेंटर सुरू केले आहे. त्याला कॅटल सर्व्हिस सेंटर व पार्लर असे नाव दिले आहे. जवळच्या गंजीवाले खणीतले पाणी पंपाने उपसून या ठिकाणी आणले आहे .तेथे एका वेळी पाच सहा म्हशी उभ्या करता येतात. येथे म्हशींना भरपूर पाणी पिता येते. आणि मोटर सुरू केली की पाण्याची धार त्यांच्या अंगावर पडू लागते. फक्त म्हशींसाठी हा शॉवर होता पण म्हशी धुताना शॉवरखाली गवळीही भिजू लागल्याने त्याची रचना थोडी बदलली गेली आहे. आज या भागातील जवळजवळ १९० म्हशींनी या शॉवर बाथचा मनसोक्त अनुभव घेतला. यामुळे पाणी वाया जात नाही, ते जवळच्या बागेत वळवले गेले आहे. शेण साठवले गेले आहे. त्याचा खत म्हणून वापर केला जात आहे. म्हशीच्या अंगावरील केस काढल्यानंतर ते याच ठिकाणी साठवण्याची सोय करण्यात आली आहे. या म्हशींच्या शॉवर बाथ मुळे गवळी व्यवसायिकांची फार मोठी सोय झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...