आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:भाजपमध्ये असल्याने माझ्यामागे ईडीची पीडा कधीच लागू शकत नाही : खासदार संजय पाटील

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तासगाव सहकारी साखर कारखाना खरेदीप्रकरणी आपल्यामागे कदापि ‘इडी‘ ची ‘पीडा’ कधीही लागणार नाही, असा दावा सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी केला आहे. खासदार संजय पाटील यांनी तासगाव सहकारी साखर कारखाना हा विकत घेऊन कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप गेली दोन वर्षे सातत्याने केला जात आहे. यासंदर्भात एका स्थानिक दैनिकाने रविवारी संजय पाटील यांची ईडीकडून चौकशी होणार, असे वृत्त प्रकाशित केले आहे. यासंदर्भात आज विटा येथील एका कार्यक्रमात संजय पाटील यांनी आपण भारतीय जनता पक्षाशी अत्यंत एकनिष्ठ असल्याने ईडी आपल्यामागे लागूच शकत नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

कर्जाचा आढावा घेतल्यास ईडीही आश्चर्यचकित होईल
काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आपण सध्या सुखाने जीवन जगत शांतपणे झोपतो, असे वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ रविवारी संजय पाटील यांनीही आपण भाजपचे विद्यमान खासदार असल्यामुळे ईडी आपल्या मागे कदापिही लागणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. आपण साखर कारखाना विकत घेताना काढलेल्या कर्जाचा ईडीने आढावा घेतला तर तेदेखील आश्चर्यचकित होतील, असे सांगून ते म्हणाले की, आपल्याकडे ज्या महागड्या चारचाकी गाड्या आहेत, त्या आपण दिखाव्यासाठी कर्ज काढून घेतल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...