आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यल्लमा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात:5 जणांचा जागीच मृत्यू, उपचारादरम्यान एकाची प्राणज्योत मालवली

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानाजवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले.

पिकअपमधून करित होते प्रवास

पिकअप वाहनातून भाविक प्रवास करत होते. अपघातातील मृत हे रामदुर्ग तालुक्यातील हुलकंद गावाचे रहिवासी होते. हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वळणावळणाच्या रस्त्यामुळे ताबा सुटून वाहन वडाच्या झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला.

भाविक पायी जात होते, चालक म्हणाला सोडतो

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायीपायी निघाले होते. यावेळी मागून येणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिले. त्याने गाडी थांबवत भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असे सांगितले. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांच्या अवधीतच हा अपघात झाला. आणि सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले.

बातम्या आणखी आहेत...