आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा नवरात्रोत्सव देवीच्या सेवेकऱ्यांचा:इमानेइतबारे मंदिरात सेवा देणाऱ्यांकडून रोज देवीचा जागर, भजन, जोगवा आणि स्तुती गायीली जाते

कोल्हापूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

पहाटे चारच्या ठोक्याला मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून ते शेजारती होऊन देवी नीद्रीस्त होईपर्यंत मंदिरात शेकडो सेवक सेवा बजावतात. इमानेइतबारे आपली सेवा बजावताना ते आई अंबाबाई चरणी सेवा देत आहोत यातच समाधान मानतात. ना दर्शनाची ना प्रसादाची कोणतीच अपेक्षा न बाळगता विविध मार्गाने देवीची सेवा बजावणाऱ्या सेवेकऱ्यांचा हा नवरात्रोत्सव आहे. म्हणूनच तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई ) मंदिरात सेवा देणाऱ्यांनी आपले काम सांभाळून मंदिरात दिवसभर जागर, भजन, जोगवा आणि देवीस्तुती गाण्यास सुरुवात केली आहे. भक्तीत लीन होऊन भजन गाणाऱ्यांमध्ये कोणी लहान मोठा नाही.श्रीपूजकांपासून मंदिराच्या सुरक्षा रक्षकांपर्यंत सगळे सहभागी होत आहेत.

नवरात्रोत्सवात क्षणभर विसावा न मिळणार्या मंदिरातील सर्वांना यंदा नीरव शांतता अनुभवायला मिळते आहे. भक्त नाही, ओसंडून वाहणार्या दर्शन रांगा नाही, पालखी भोवती भक्तांचा गराडा नाही सगळं सुन सुन. मंदिरात सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणारे सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट असतो. साडेबाराच्या आरती नंतर मात्र मंदिरात टाळ मृदंगाचे स्वर निनादू लागतात. सनईची सेवा देणारा अमित साळोखे या भजनी मंडळाचा पहिला मेंबर त्यांच्यासोबत देवीच्या दागिन्यांचा पीढीजात खजिनदार महेश खांडेकर, सीसीटीव्ही यंत्रणा आणि वेबसाईटचे काम पाहणारा राहुल जगताप, अभिजीत पाटील, सर्व श्रीपूजक, श्रीपूजक आणि सामाजिक कार्यकर्ती ऐश्र्वर्या मुनीश्वर, प्रमोद धर्माधिकारी, भारत पारकर याच्यासह‌ मंदिरात सेवा देणारी सगळी मंडळी आता सहभागी होत आहेत. मंदिर लाॅकडाऊन झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी हे भजनी मंडळ मंदिरात अस्तित्वात आले. सध्या नवरात्रोत्सवात सुन्या मंदिरात या भजनाच्या सुरांनी चैतन्य निर्माण होत आहे.

पन्नगालय दर्शन रुपात करवीर निवासिनी महालक्ष्मी

आज तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची 'पन्नगालयावरील म्हणजेच पन्हाळ्यावरील नागांना दर्शन' रूपात पूजा बांधण्यात आली होती. पन्नगालयावरील म्हणजेच पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत विराजमान झालेली आहे. या प्रसंगाची पार्श्श्वभूमी अशी, पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरुपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नागलोकांना होऊ लागते. त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात. परंतू शेवटी शापभयाने नागलोक पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जाऊन श्रीमहालक्ष्मीचे दर्शन घेऊन तिलाच विचारण्यास सांगतात. तेव्हा नागलोक महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तिची स्तुती करतात.

बातम्या आणखी आहेत...