आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेंद्र यादव यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास:भारत जोडो यात्रा जनतेचे मौन तोडेल

सातारा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशात अभूतपूर्व स्थिती आहे. समस्या केवळ सरकारबद्दलची नाही किंबहुना लोकशाहीवरच संकट नाही, तर घटना व संपूर्ण देशावर संकट आहे. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठवण्याची गरज होती. तो आवाज राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे बुलंद होईल. ही भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल, असा विश्वास स्वराज्य इंडिया पार्टीचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर उपस्थित होते.

कराड येथे कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ या जनसंवाद यात्रेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस नेते उदयसिंह पाटील यांनी स्वागत केले.

केजरीवाल सरकारचा दाखला देत योगेंद्र यादव म्हणाले की, दिल्लीत एक मंत्री डॉ. बाबासाहेबांची शपथ घेतो. त्याच्याविरोधात भाजप देशभर आंदोलन करतो आणि आम आदमी पार्टी त्याला पक्षातून काढून टाकते. आज त्याच पध्दतीने हिंदुत्वाच्या आडून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. हे मला महाराष्ट्रात येऊन सांगण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर नवे सरकार तयार झाले आहे. तो गुवाहाटीतील नाटक संपूर्ण देशाने पाहिला आहे. या देशातील धर्मनिरपेक्षता संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...